अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सूनेबद्दल तुम्हाला माहितीये का?, ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 07:00 AM2022-05-28T07:00:00+5:302022-05-28T07:00:01+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. खरंतर उमा हे नाव त्यांना लता दिदींनीच दिले होते. त्यांचे मूळ नाव होते अनसूया साकरीकर.

उमा भेंडे या मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यांनी १९६० सालच्या आकाशगंगा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो अमुच्या गावा, दोस्ती, काका मला वाचवा, भालू, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटात त्यांनी काम केले होते.

मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी उमा यांनी विवाह केला. ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले. (Photo Instagram)

‘श्री प्रसाद चित्र’ ही त्यांची निर्मिती संस्था, या माध्यमातून त्यांनी भालू, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटकचांदनी अशा चित्रपटांची निर्मिती केली. १९ जुलै २०१७ रोजी उमा भेंडे यांनी जगाचा निरोप घेतला.

उमा भेंडें याची यांचा मुलगा प्रसाद भेंडे हा मराठी सिनेइंडस्ट्रीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळतो आहे. दुनियादारी हा त्याचा पहिलाच चित्रपट खूपच यशस्वी झाला. (Photo Instagram)

उमा भेंडे यांचा मुलगा प्रसादची पत्नी हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव आहे श्वेता महाडिक. प्रसाद आणि श्वेताला एक मुलगा असून त्याचे नाव अभिर आहे. (Photo Instagram)

श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले फोटो आणि डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

गुड्डन तुमसे ना हो पायेगा, कृष्णदासी, एक श्रीनगर स्वाभिमान या हिंदी मालिकेत तिने काम केले आहे. (Photo Instagram)

श्वेताने लोकमान्य-एक युगपुरुष या मराठी चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

(Photo Instagram)

टॅग्स :सिनेमाcinema