मानसीच्या लग्नाला यायचं हं, काऊंटडाऊन सुरू, पाहा दोघांचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 11:26 AM2020-12-24T11:26:53+5:302020-12-24T11:50:14+5:30

मानसी नाईक ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

लग्न घटिका समीप आली करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या लग्नाच्या तयारीत बिझी असली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह तिचा आनंद शेअर करताना ती दिसते.

लग्नानंतर मिसेस बनत मानसी नाईकचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.

नवीन वर्षात 19 जानेवारी 2021 रोजी प्रदीप खरेरासोबत मानसी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत.

मानसीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करुन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते.

तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे.

प्रदीप खरेरा सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंट व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ 82 हजार फॉलोवर्स आहेत.

'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या सिनेमांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

मानसी नाईकचे लग्नाच्या बेडीत अडकत आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे.