आर्चीच्या 'सुमन अक्का'चा रिअल लाईफ अंदाज बघून तुम्हीही म्हणाल 'सैराट झालं जी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 09:00 AM2021-09-26T09:00:00+5:302021-09-26T09:00:00+5:30

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.सैराट सिनेमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची परशा यांच्या प्रमाणे इतर कलाकारांच्याही भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतल्या होत्या.

'सैराट'मुळे अभिनेत्री छाया कदमचीही प्रचंड चर्चा झाली.

आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती.

छोटीशी पण लक्षवेधी अशी भूमिका छाया कदम यांनी साकारली होती.

'सैराट'च नाहीतर 'फँड्री' आणि 'रेडू' सिनेमातल्याही भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली होती.

छाया कदम यांनी 'न्यूड' या सिनेमांत न्यूड मॉडेल्सची भूमिका साकारली होती.

भूमिका परफेक्ट व्हावी यासाठी त्या प्रचंड मेहनत घेतात.

ऑनस्क्रीन साध्या सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या छाया कदम खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहेत.

सोशल मीडियावर त्यांचे विविध अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात.

जितक्या सोज्वळ तितक्याच ग्लॅमरस त्यांचे फोटो पाहिल्यांनर कळते.