PICS : अरेच्चा, आर्चीचा परश्या इतका बदलला! मेकओव्हर पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 08:00 AM2021-02-24T08:00:00+5:302021-02-24T08:00:07+5:30

आकाशचा आज वाढदिवस...

परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या चित्रपटातून रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते

‘सैराट’नंतर आकाश ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात झळकला होता. मात्र त्यानंतर आकाशचा झालेला मेकओव्हर तुम्हालाही आश्चर्यचकित करणारा आहे.

2016 मध्ये ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर आकाशने त्याच्या लूकमध्ये बराच बदल केला. गेल्या तीन वर्षांत त्याने फिटनेसवर फार भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सैराट या सिनेमाने आकाश एका रात्रीत स्टार झाला. परशा उर्फ आकाश ठोसरचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे 24 फेब्रुवारी 1993 रोजी एका सामान्य कुटूंबात झाला.

सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी आकाश पैलवान होता. त्याला कुस्ती खेळायला खूप आवडायची. पण त्याने नशिब आजमवण्यासाठी कुस्ती करता-करता ऑडिशन दिले आणि या ऑडिशनने त्याचे अख्खे आयुष्य बदलले.

आकाशने पुणे विद्यापिठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पण पूर्ण केले. या पहिल्याच ऑडिशनमध्ये त्याचे सिलेक्शन झाले. तेही सहाय्यक कलाकार म्हणून नाही तर मुख्य अभिनेता म्हणून झाले. हा चित्रपट होता दिग्दर्शक नागराज मंजूळे यांचा सैराट.

सैराट चित्रपटामुळे आकाशला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटासाठी त्याने तब्बल 13 किलो वजन घटविले. या चित्रपटानंतर आकाश महेश मांजरेकर दिग्दर्शित फ्रेंडशीप अनलिमिटेड चित्रपटाच झळकला.

या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तो नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरिजमध्ये अभिनेत्री राधिका आपटेसोबतही पहायला मिळाला. या सीरिजमधील त्याच्या कामाची प्रशंसा झाली.

आकाश लवकरच ‘1962 - द वॉर इन द हिल्स’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजच्या सेटवरचे हे फोटो आहेत. आकाश या वेबसीरिजमध्ये किशन नावाच्या आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे.

या वेबसीरिज व्यतिरिक्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातही आकाश दिसणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची आकाशला संधी मिळाली आहे.