Bigg Boss Marathi 3: आदिश वैद्यची रिअल लाइफ Bigg boss कोण माहितीये का? पाहा त्याच्या ladyloveचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:34 PM2021-10-11T15:34:04+5:302021-10-11T15:45:27+5:30

Adish Vaidya: आदिशने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनंतर 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत काम केले होते. तर रेवती 'वर्तुळ' या मालिकेत दिसली होती.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आदिश वैद्य.

या मालिकेत आदिशने निलिमा आणि माधव यांच्या मुलाची आर्चिसची भूमिका साकारली होती. सध्या आदिश 'बिग बॉस मराठी ३' मध्ये दिसून येत आहे.

आदिशने बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केल्यापासून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगू लागली आहे. यामध्येच त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत त्याची पर्सनल लाइफही चर्चेत आली आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये आदिशच्या प्रेयसीची चर्चा रंगली आहे. आदिशची प्रेयसीदेखील त्याच्या प्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे.

रेवती लेले असं आदिशच्या प्रेयसीचं नाव असून ती अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.

रेवतीने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे

रेवती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे.

रेवती अनेकदा आदिशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामिनी’ या मालिकेतील रेवतीने रमा ही भूमिका साकारली होती.

मूळची जळगावची असलेली रेवती अभिनेत्री व मॉडेल आहे.

आदिशने रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत काम केले होते तर रेवती वर्तुळ या मालिकेत दिसली होती.