भाग्यश्री मोटेनं सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा प्रियकर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:31 PM2022-05-21T18:31:03+5:302022-05-21T18:35:37+5:30

Bhagyashree Mote: भाग्यश्री मोटे हिने नुकतेच सोशल मीडियावर प्रियकरासोबतचा फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.

भाग्यश्री मोटे हिने नुकतेच सोशल मीडियावर प्रियकरासोबतचा फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे.

भाग्यश्री मोटे हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, माझा. या कॅप्शनसोबत हार्ट इमोजीदेखील शेअर केली आहे.

तिच्या प्रियकराचे नाव विजय पालांडे असून त्यानेदेखील या पोस्टवर कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, सर्वस्वी तुझाच.

भाग्यश्री मोटेच्या प्रियकराचे नाव विजय पालांडे असून तो मेकअप डिझायनर आहे. विजयने देखील त्याच्या सोशल मीडियावर भाग्यश्रीसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंना माझे प्रेम असे कॅप्शन दिले आहे.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.

तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.

याशिवाय ती लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.