अय्यो रामा..प्राजक्ता माळी दाक्षिणात्य लूकमध्ये दिसतेय की लय भारी!

Published: May 12, 2021 05:20 PM2021-05-12T17:20:30+5:302021-05-12T17:32:57+5:30

प्राजक्ता माळीने दाक्षिणात्य लूकमधील फोटोतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ता माळीने दाक्षिणात्य लूकमधील फोटोतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, दाक्षिणात्य नारी

प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

प्राजक्ता माळीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

पांढऱ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यांमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.

प्राजक्ता माळीने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

प्राजक्ता माळी लकडाउन या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!