अशी रंगली अमृता खानविलकरची बर्थ डे पार्टी, शेअर केला पतीसोबतचा रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:08 PM2021-11-24T13:08:13+5:302021-11-24T13:13:18+5:30

अभिनेत्री Amruta Khanvilkarचा वाढदिवस काल दणक्यात साजरा झाला. छोटेखानी बर्थ डे पार्टी झाली आणि या पार्टीत अमृता, तिचा पती हिमांशू व मित्रमंडळींनी धम्माल मज्जा केली.

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बर्थ डे पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.

पार्टीत मराठी इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटीही सहभागी झालेत. या सर्वांसमोर अमृता व तिचा पती हिमांशूने धम्माल मस्ती केली.

अभिनेत्री सोनाली खरे ही या पार्टीला हजर होती. आपल्या मुलीसोबत ती पार्टीत सहभागी झाली होती. तुम्हाला माहित असेलच की, सोनाली अमृताची जवळची मैत्रिण आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिनेही अमृताची बर्थ डे पार्टी एन्जॉय केली. नेहाने हिमांशू व अमृतासोबत मस्तपैकी पोझही दिली.

सर्वांचा लाडका प्रसाद ओकसुद्धा आपली पत्नी आणि अभिनेत्री मंजिरी ओकसोबत अमृताच्या बर्थ डे पार्टीला पोहोचला होता.

निर्माते अक्षय बदार्पूरकरसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासोबतही अमृताने मस्तपैकी पोझ दिली.

मनाली दीक्षित आणि सौम्या विलेकर यांनीही अमृताच्या पार्टीला हजेरी लावली.