आकाश ठोसरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहून नेटकरी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:42 PM2021-07-16T14:42:51+5:302021-07-16T14:50:48+5:30

अभिनेता आकाश ठोसर आता त्यांच्या डॅशिंग लूकसाठी जास्त ओळखला जाऊ लागला आहे. त्याचा लूक पाहून तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडिया पेजवर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचे वेगवेगळे लूक पाहायला मिळतील.

काळानुरुप बदलायला हवं ही बाब आकाश ठोसरच्याही चांगलीच लक्षात आली आहे.

त्यामुळे आकाश त्याच्या लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाला आहे.

त्याच्या लूकमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे.

पूर्वीपेक्षा जास्त हँडसम तो आता दिसू लागला आहे.

आकाशची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.

पिळदार बॉडी पाहून त्याच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

फिटनेसबाबत सजग असलेला आकाश जिममध्ये घाम गाळत असल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे.

त्याचा डॅशिंग अंदाज पाहून चाहत्यांच्याही नजरा त्याच्या फोटोवरुन हटत नाही.

आकाशने अभियाने रसिकांची पसंती मिळवली असली तरी त्याच्या लूकवरही त्याने प्रचंड मेहनत केली आहे.

आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही