अभिनय ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या मराठमोळ्या दिपाली सय्यदचे फोटो पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 07:48 PM2020-05-22T19:48:10+5:302020-05-22T20:05:13+5:30

मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

अभिनयाशिवाय तिने राजकारणातही प्रवेश केला आहे.

दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला.

बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत.

त्यानंतर अनेक मालिका, चित्रपट, नाटक व शोज, जाहिरातीमधून ती झळकली

दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखल्या जाते.

मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून तिला मिळाली.

करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.

दुर्वा व अफलातून या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे

याशिवाय भोजपुरी सिनेमातही काम केले आहे.

31 मे, 2008 साली दिपाली यांनी दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांचे नाव सोफिया जहांगीर सय्यद असे आहे.

अभिनयानंतर दिपाली सय्यदने राजकारणात प्रवेश केला.

2014 मध्ये तिने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणुक लढवली होती. मात्र त्यावेळी तिचा पराभव झाला होता.

विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातून ती शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.