सावित्री, राजगुरू, टिळक, विवेकानंद... मराठी कलाकारांचं 26 स्वातंत्र्यसैनिकांना वंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 11:09 AM2019-01-26T11:09:09+5:302019-01-26T12:02:10+5:30

फोटोग्राफर तेजस नेरुरकरने 2019 सालची एक अप्रतिम भेट आणली आहे. त्याने मराठीतल्या 26 वेगवेगळ्या सिनेकलाकारांना घेऊन एक कॅलेंडर तयार केलंय. या कॅलेंडरचं नाव आहे ‘वंदे मातरम 2019'. नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असणार की कॅलेंडरमध्ये काय पाहायला मिळेल. हे कॅलेंडर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सेनानींना अर्पण करण्यात आलंय.

26 सिनेकलाकार आणि 26 स्वातंत्र्य सेनानी अशी या कॅलेंडरची कल्पना आहे. या कॅलेंडरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला काही अज्ञात स्वातंत्र्यसैनिक भेटतात. उदाहरणार्थ प्रीतिलता वड्डेदार, सुब्रमण्य भारती, बेगम हजरत महाल आणि असे बरेचजण.

कलाकारांची निवडही कौतुकास्पद आहे. काही कलाकार तर आपल्याला ओळखूही येणार नाहीत इतके त्या भूमिकेत फिट बसले आहेत.