Raju Shetty : 'लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकरदारांना 50 टक्केच पगार द्यायला हवा होता'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 05:09 PM2021-10-10T17:09:53+5:302021-10-10T19:03:37+5:30

लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे रोजगार बुडाले. पण, सरकारी नोकरदारांना 5 ते 10 टक्के उपस्थिती असतानाही संपूर्ण पगार मिळाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या एफआरपी दरावरुन खासदार शरद पवार यांच्यावर प्रहार केला आहे.

मी आज कोणासोबतही, मी केवळ शेतकऱ्यांच्याजवळ आहे. योग्य वेळ येताच मी माझी भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि एफआरपीच्या तीन तुकड्यांबद्दलच्या मुद्द्यांवरु शरद पवार यांना लक्ष्य केले.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत तोकडी आहे, सरकारकडे पैसा नसल्याचं सरकार सांगत आहे. पण, अशा परिस्थितीने सरकारने पैसा उभा करायचा असतो.

आज वसंत दादा पाटील यांची आठवण येते, वसंत दादा असते तर त्यांनी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असते, असे म्हणत राजू शेट्टींनी शेतकऱ्यांबद्दलच्या सरकारी धोरणावर टीका केली.

लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे रोजगार बुडाले. पण, सरकारी नोकरदारांना 5 ते 10 टक्के उपस्थिती असतानाही संपूर्ण पगार मिळाला.

घरी बसून सरकारी कर्मचाऱ्यांनी पगारी घेतल्या, गेल्याच आठवड्यात त्यांना सरकारने महागाई भत्ताही दिला. वसंत दादा पाटील आज असते तर त्यांनी स्पष्टच सांगितलं असतं.

सरकारी नोकरदारांनो, तुम्ही घरी बसून पगार घेतलाय, सरकार आता तुम्हाला 50 टक्के पगार देईन. 50 टक्के पगार तुम्हाला सरकार देईल, पण आज 50 टक्के पगारावरच घर चालवा, असे वसंत दादांनी म्हटले असते.