काका-पुतण्याची 'हिट' जोडी; कुठे भांडण, कुठे गोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:13 PM2018-10-30T17:13:50+5:302018-10-30T19:26:46+5:30

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे - महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतण्याच्या अनेक जोड्यांनी छाप पाडली आहे. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध काका-पुतण्याची जोडी म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे गिरवणाऱ्या राज ठाकरे यांनी मनसे या स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून आता आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शरद पवार आणि अजित पवार - ठाकरे कुटुंबीयांप्रमाणेच पवार कुटुंबीयांचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. शरद पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदासह केंद्रात विविध मंत्रिपदे यशस्वीरीत्या सांभाळली. तर अजित पवार यांनीही राज्यात उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे.

वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक - राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारी ही काका-पुतण्याची एकमेव जोडी आहे. वसंतराव नाईक यांनी 1963 ते 1975 असे दीर्घकाळ राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. तर सुधाकरराव नाईक यांनी या काळात राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.

गोपिनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे - महाराष्ट्रात भाजपाची पाळेमुळे रोवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गोपिनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये धनंजय मुंडे यांचे नेतृत्व विकसित झाले. मात्र राजकारणावरून कुटुंबात वाद झाल्याने धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ - छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका-पुतण्याच्या जोडीनेही महाराष्ट्रातील राजकीय सारीपाटावर बऱ्यापैकी यश मिळाले. छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रिपद, तसेच विविध महत्त्वाची पदे भूषवली. तर समीर भुजबळ यांनी खासदारकी भूषवली होती.

अभयसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले - साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांचे काका अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील राजकारणावर आपला प्रभाव पाडला आहे.

महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक - महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक या काका पुतण्यांनी कोल्हापूरच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. धनंजय महाडिक हे सध्या खासदार आहेत.