२०मार्च : जागतिक चिमणी दिन- नाशिकमध्ये मातीला आकार देणारे हात करताहेत चिमणी संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:57 PM2018-03-19T16:57:44+5:302018-03-19T16:57:44+5:30

मातीच्या सुमारे चाळीस घरट्यांपैकी वीस घरट्यांमध्ये चिऊताईने सुखाचा संसार थाटलेला आहे

चिऊताईसाठी आकर्षक मातीच्या वाडग्याचा निवारा

मातीच्या वाडग्यामध्ये चिमण्यांचा आनंदी संसार

नाशिकच्या तुलसीदास पटकिया हे मातीपासून विविध भांडी तयार करतात. कुंभार व्यवसाय सांभाळताना त्यांना चिमण्यांचा पाच वर्षांपुर्वी लळा लागला.

चिऊताईचा चिवचिवाट मनाला समाधान देणारा आणि कामातील ताण घालवणारा असल्याचे तुलसीदास सांगतात. चिऊताईचा संसार चालविण्यासाठी दिवसभर सुरू असलेला आटापिटा आपल्याला उर्जा देऊन जातो, असे ते आवर्जून सांगतात. (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे)