Maratha Reservation Protest : आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 03:46 PM2018-07-30T15:46:28+5:302018-07-30T16:13:23+5:30

मराठा आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत सकल मराठा समाजाने आंदोलन केले आहे.

चाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले, अग्निशामक दल, एसटी बस व पोलिसांच्या गाड्या पेटवल्या.

चाकणमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. जमावाने 100 ते 150 गाड्यांची तोडफोड केली.

सोलापूरमध्ये मराठा मोर्चा बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.

सोलापुरातील शिवाजी चौकामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला.

औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.

चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.