प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:57 IST
1 / 12Konkan Railway Special Train For Christmas Time Table: पावसाळी वेळापत्रकाची सांगता झाल्यानंतर कोकण रेल्वेवर नियमित वेळापत्रक सुरू झाले आहेत. यामुळे ट्रेन सेवा आणि वेग या दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. हिवाळी आणि नाताळ सुट्टीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. यामुळे मुंबई गोवा मार्गावरील ट्रेन सेवा वाढणार आहेत. याचा चांगला फायदा प्रवाशांना होणार असल्याचे सांगितले जात आहे.2 / 12हिवाळ्यात नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई सीएसएमटी-करमाळी-मुंबई सीएसएमटी स्पेशल (दररोज), एलटीटी – तिरुवनंतपुरम उत्तर एलटीटी विशेष (साप्ताहिक) आणि ट्रेन एलटीटी मंगळुरू जं. – एलटीटी विशेष (साप्ताहिक) या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.3 / 12कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, (ट्रेन क्र. ०११५१) मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (दैनिक) ही १९ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत दररोज मुंबई सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात (गाडी क्र. ०११५२) करमाळी – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) १९ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दररोज दुपारी २.१५ वाजता करमाळीहून सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी ३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.4 / 12या गाडीची रचना २ टायर एसी २ कोच, ३ टायर एसी ८ कोच, स्लीपर ६ कोच, जनरल ४ कोच, एसएलआर २ अशी असेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. 5 / 12लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष (ट्रेन क्र. ०११७१) ही गाडी १८ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान दर गुरूवारी म्हणजेच १८ डिसेंबर, २५ डिसेंबर, १ जानेवारी २०२६ आणि ८ जानेवारी या कालावधीत एलटीटी येथून दुपारी ४ वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.6 / 12परतीच्या प्रवासात (गाडी क्र. ०११७२) तिरुवनंतपुरम उत्तर – एलटीटी विशेष (साप्ताहिक) दर शनिवारी म्हणजेच २० डिसेंबर, २७ डिसेंबर, ३ जानेवारी २०२६ आणि १० जानेवारी दरम्यान तिरुवनंतपुरम (उत्तर) येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी १ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. 7 / 12ट्रेन क्रमांक ०११८५ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस - मंगळुरू जंक्शन स्पेशल (साप्ताहिक) १६, २३, ३० डिसेंबर आणि ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११८६ मंगळुरू जंक्शन - मुंबई एलटीटी स्पेशल (साप्ताहिक) १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७ जानेवारी रोजी बुधवार दुपारी १ वाजता मंगळुरू जंक्शनवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता एलटीटीला पोहोचेल.8 / 12ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकंबिका रोड, कुंदपुरा, उडपी आणि सुरथकल या स्थानकांवर थांबेल. यात एक 1st AC, तीन 2-tier AC, 15 3-tier AC, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर कार कोच, एकूण 22 LHB डबे असतील.9 / 12गाडी क्रमांक ०११५२ चे आरक्षण सोमवार पासून (८ डिसेंबपासून) सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम्स (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.10 / 12दरम्यान, भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्यांसाठी अनेक ठिकाणी आता ओटीपी आवश्यक केला आहे. कोकण रेल्वेनेही तत्काळ तिकिटांसाठी ओटीपी आवश्यक प्रक्रिया मडगाव दिल्ली राजधानी एक्स्प्रेससाठी सुरू केली आहे.11 / 12प्रवाशांनो कृपया लक्षात ठेवा की, बुकिंगच्या वेळी वापरकर्त्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर सिस्टमद्वारे जनरेट केलेला ओटीपी पाठवल्यानंतरच संगणकीकृत पीआरएस काउंटर / अधिकृत एजंटद्वारे तत्काळ तिकिटे बुकिंगसाठी उपलब्ध असतील. 12 / 12ही प्रमाणीकरण प्रणाली ट्रेन क्रमांक २२४१३ मडगाव जंक्शन एच. निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेससाठी ०५/१२/२०२५ पासून लागू होईल.