राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 03:37 PM2019-09-02T15:37:36+5:302019-09-02T15:50:56+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालंय. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी - सहकारी उपस्थित होते.

नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली.

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी त्यांनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.