यंदा कर्तव्य आहे... 'मतदानाचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:02 PM2019-04-23T16:02:46+5:302019-04-23T16:14:02+5:30

रत्नागिरी - लग्नाचा किंवा एखाद्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा वाटावा असा मंडप, रांगोळी, फुग्यांची सजावट असलेली कमान... हाही एक मंगल कार्यक्रमच. कारण हे आहे सखी मतदान केंद्र. महिलांसाठी स्वतंत्रपणे उभारलेली सखी मतदान केंद्र हा खूपच आकर्षणाचा विषय झाले आहे.

यंदा मतदानासाठी तरुणांसह वृद्धांचाही उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. तर, निवडणूक अधिकाऱ्यांनीही मतदान केंद्रावर सेल्फी पाँईंट तयार केल्याचं पाहायला मिळाल.

रायगड - खारगांव(तळा) येथे व्हील चेअरमधुन मतदानास जाताना दिव्यांग वृद्ध महिला मतदार

जळगाव दापोली येथील कन्या सुप्रिया गुरवने लग्नमांडवात जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन कर्तव्य बजावले.

सखी मंचच्या माध्यमातून मतदान केंद्रावर हटके अन् लक्षवेधी सजावट करण्यात आली होती. या सजावटीमुळे मतदान केंद्राला जणू मंगल कार्यालयाचेच रुप आले होते.

दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनीही आपल्या वयोवृद्ध आईला सोबत घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.

रायगड जिल्हापरिषदेच्या व्हील चेअर सुवीधे मुळे दिव्यांग मतदार सुलभतेने पोहोचले मतदान केंद्रात.

पुण्यातील आधी लगान लोकशाहीचे म्हणत, लग्नासाठी नटलेल्या नवरीने थेट मतदान केंद्र गाठले आणि रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी चक्क रिक्षातून प्रवास करत मतदान केंद्रावर हजेरी लावली.