corona virus : कुठे घंटानाद, कुठं थाळी, कुठे फुंकले शंख तर कुठं टाळ्याचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 07:53 PM2020-03-22T19:53:19+5:302020-03-22T21:31:52+5:30

join the nation in saluting the doctors, paramedical staff, the first responders, those handling essential services and the media personnel for their selfless service in combatin

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनीही थाळी आणि टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्यास, नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर, मोदींच्या आवाहनानुसार देशातील कोरोना संकटाच्या काळात आपलं योगदान देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटनाद करत देशातील डॉक्टर्स आणि पोलिसांप्रति आदर व्यक्त केला. तसेच, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमून गेला.

माजी मुख्यंमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही थाळी वाजवून कुटुंबासह मोदींच्या आवाहनाला साद दिली

भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही घंटानाद करत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांनीही थाळी वाजवून मुलाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

पंकजा मुंडे यांनीही थाळी वाजवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनीही आपल्या कुटंबासमवेत घंटानाद करुन मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

अभिनेता अनिल कपूर यानेही टाळ्या वाजवून ५ वाजता मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कुटुंबासमेवत आणि उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत कोरोनाच्या लढाईला तैय्यार असल्याचं दाखवून दिलं

भाजापाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही घंटानाद करुन मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटनाद करत देशातील डॉक्टर्स आणि पोलिसांप्रति आदर व्यक्त केला. तसेच, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमून गेला.

नरेंद्र मोदींनी देशावासियांचे आभार मानले, तसेच करोना संकटकाळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व देशबांधवांनाही नमन केले. तर, कोरोनासोबतची आपली लढाई संपली असून आता खरी सुरुवात झाली आहे.