'जनता कर्फ्यू'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मुंबईतल्या रस्त्यांवर शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 04:11 PM2020-03-22T16:11:31+5:302020-03-22T16:34:05+5:30

राज्यातले दिवसरात्र वाहनं आणि मनुष्यांनी गजबजलेले रस्ते आज निर्मनुष्य झालेले पाहायला मिळाले.

ठाणे-मुंबईकरांनी घरी राहूनच जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद देत कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईत आपला सहभाग दाखवला.

पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. कायम वर्दळ असणाऱ्या पुण्यात आज स्मशान शांतता पसरली होती.

नागपूरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून, जनता कर्फ्यूला लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईतल्या हाजी अली आणि महालक्ष्मी परिसरातही रस्त्यांवर सन्नाटा होता.

शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. दुधापासून ते पेट्रोल पंपापर्यंत सर्व बंद करण्यात आलं होतं.

मुंबईतली दादर, माटुंग्यासारखी रेल्वे स्थानकं ओस पडल्याचं चित्र होतं.

. जनता कर्फ्यूला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला आहे, नवी मुंबईतील सर्व रस्ते शून्य होते, तसेच सगळे व्यवहारसुद्धा ठप्प झाले होते,

कोल्हापूरमधून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जनता कर्फ्यूच्या काळात शुकशुकाट होता.

पोलिसांची जागोजागी तपासणी सुरू असून, चिपळूण -गुहागर -संगमेश्वरमध्येही आज कडकडीत बंद होता.

दिवसभर नागरिक घरात थांबल्याने ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी झाल्याचं चित्र आहे.

जनता कर्फ्यूनिमित्त संपूर्ण अंबरनाथ आणि बदलापूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.

राज्यातील अनेक आगारांत एसटी बसेस कधी नव्हे त्या रांगेत उभ्या असलेल्या पाहायला मिळत होत्या.

मॉल्स आणि मल्टिफ्लेक्समध्येही आज एकदम शुकशुकाट होता.

पोलिसांची जागोजागी तपासणी सुरू असून, चिपळूण -गुहागर -संगमेश्वरमध्येही आज कडकडीत बंद होता

टॅग्स :मुंबईMumbai