प्रेमात पडलात तर या गोष्टींची काळजी घ्याच...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 05:29 PM2018-01-29T17:29:11+5:302018-01-29T17:57:15+5:30

अनेकदा मुले रिलेशनशिपमध्ये असताना मुलींना महत्व देणे बंद करतात. त्यामुळे प्रियकराच्या आयुष्यात आपल्याला फारसे महत्व राहिलेले नाही असे मुलींना वाटते. मुले निर्णय घेताना प्रेयसीच्या मताला फारशी किंमत देत नाहीत. अशा मुलांपासून मुली लवकर दूर जातात.

आयुष्यात वेळेला खूप महत्व आहे. वेळ पैशांपेक्षाही जास्त महत्वाची असते. ज्यावेळी तुम्ही कोणाला खास वेळ देता त्याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीला वेळ द्या, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जी मुल वेळ देत नाहीत ते नाते तोडायला मुलींना अजिबात संकोच वाटत नाही.

शरीरसंबंधात प्रियकर-प्रेयसी शरीराने एकत्र येतात तेव्हा ते मनानेही एकत्र येणे आवश्यक असते. जी मुल फक्त शरीरसंबंधांसाठी मुलीचा वापर करतात त्या नात्यात ब्रेकअप ठरलेला असतो.

जेव्हा प्रेमात स्वार्थीपणा सुरु होता. प्रियकर प्रेयसीपासून गोष्टी लपवायला सुरुवात करतो ते सुद्धा नाते तुटण्यामागचे एक कारण ठरते.

प्रियकर जेव्हा प्रेयसीची दुस-या मुलीबरोबर तुलना करतो ते मुलींना अजिबात सहन होत नाही. एकदा-दोनदा खोडकरपणा म्हणून प्रेयसी अशी तुलना खपवून घेते पण वारंवार असे घडत असेल तर ती नाते तोडण्याचा निर्णय घ्यायला अजिबात कचरत नाही.