राशीवरुन ओळखा त्याचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 03:57 PM2018-05-30T15:57:11+5:302018-05-30T15:57:11+5:30

मेष राशीच्या स्वभावाची मुलं सरळ मार्गी चालणारे, मात्र हट्टीदेखील असतात. प्रेम प्रकरणामध्ये प्रामाणिक असतात. प्रेम खरं असेल तर ते व्यक्तदेखील करतात.

वृषभ राशीची मुलं प्रेम प्रकरणात गंभीर असतात. या राशीच्या मुलांना प्रेम झाल्यास जास्तीत जास्त वेळ आपल्या साथीदारासोबत घालवणं पसंत करतात.

मिथुन राशीच्या मुलांना प्रेमामध्ये टाइमपास करणं पसंत नसते. प्रेम खरं असेल तर आपल्या पार्टनरच्या आसपासच राहणं त्यांना आवडतं.

कर्क राशीची मुलं स्वभावानं भावनिक असतात. प्रेमामध्ये जर एखादी व्यक्ती त्यांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी झाली तर त्या व्यकीची साथ ते शेवटपर्यंत सोडत नाहीत.

सिंह राशीची मुलं साथीदारासोबत एकनिष्ठ राहणारी असतात. यांना खरं प्रेम झाल्यास याबाबत संपूर्ण जगाला ओरडून सांगण्यास त्यांना भीती वाटत नाही.

कन्या राशीची मुलं थोडीशी लाजरी असतात. जर कोणामध्ये ते आवड दाखवत असतील तर त्यांच्या मनात भावना आहेत, हे समजून जावे.

तूळ राशीची मुलं प्रेमात रोमँटिक आणि साथीदाराच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेणारे असतात.

वृश्चिक राशीची मुलं सत्य आणि खुल्या विचारांचे समर्थन करणारी असतात. प्रेम व्यक्त करण्यात संकोच वाटत नाही. मनमोकळेपणानं प्रेम करतात.

धनु राशीच्या मुलांना नात्यामध्ये स्वातंत्र्य देणे-घेणे पसंत असते.

मकर राशीची मुलं सहजासहजी कोणाकडेही आकर्षिक होत नाहीत. एखादी व्यक्ती आवडत असल्यासच बोलणी वाढवतील अथवा जेवढ्यास तेवढीच बोलणी करतील.

कुंभ राशीच्या मुलांचा स्वभाव थोडासा रहस्यमय असतो. सुरुवातीला अगदीच मनमोकळेपणानं ते बोलत नाही. पण जर कुणी आवडत असेल तर त्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी ते संधी शोधत असतात.

मीन राशीची मुलं अत्यंत रोमँटिक असतात. लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. ज्या कोणावरही प्रेम करतात त्यांच्यावर डोळे बंद ठेऊन विश्वास ठेवतात.