'स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह'....हसन मुश्रीफांची जोरदार बॅटिंग

By मोरेश्वर येरम | Published: January 11, 2021 07:16 PM2021-01-11T19:16:39+5:302021-01-11T19:26:56+5:30

राजकारणाच्या खेळपट्टीवर सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळख असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार बॅटिंग केली.

राजकारणाच्या खेळपट्टीवर सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळख असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार बॅटिंग केली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नामदार चषकाच्या अंतिम सामन्यात तरुणांबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

कागल येथे गहिनीनाथ गैबी पीर नगर येथे गेल्या पाच दिवसांपासून नामदार चषक स्पर्धा सुरू होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाली.

मुश्रीफ यांनी यावेळी कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह लगावून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.

अंतिम सामन्याचे नाणेफेक करून क्रिकेट खेळाडूंना हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या