शहीद जवानाला निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय, ऋषिकेश जोंधळे अमर रहे च्या घोषणेने परिसर दुमदुमला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 03:51 PM2020-11-16T15:51:33+5:302020-11-16T16:13:32+5:30

Rishikesh Jondhale : हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बहिरेवाडी ( ता. आजरा ) येथे शदहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या अंत्यसंस्काराठी जमलेला जनसमुदाय

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली वाहताना हसन मुश्रिफ

सतेज पाटील यांनीही हुतात्मा जवानास श्रद्धांजली वाहीली.

आई-वडील, बहीण कल्याणी यांना ऋषीकेशला अखेरचा निरोप देताना शोक अनावर झाला होता.

भाऊ कुंडलिक जोंधळे यांनी ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला

पार्थिव गावात आल्यापासून अत्यसंस्कार होईपर्यंत परिसरातील ग्रामस्थांनी स्वंयशिस्त पाळली . अलोट अशी गर्दी होती . ग्रामस्थांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मास्कचा वापर सर्वांनी केला होता

कोल्हापूर पोलिस , मराठा सहा लाईफ इंन्फंट्री बटालियन बेळगाव यांनी अखेरची मानवंदना दिली