अवघं शहर... आलं सायकलवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 03:15 PM2018-11-25T15:15:19+5:302018-11-25T15:25:17+5:30

कोल्हापुरात प्रदूषण अन् कचरा मुक्तीसाठी लोकमत समुहाकडून सायकल राईड घेण्यात आली. त्यास नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला.

चिमुकल्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच विविध वेशभुषा आणि कलाकारी करत ग्रीन कोल्हापूरसाठी सायकलाच पँडल मारला.

रॅलीत सहभागी तरुणांकडून जय भवानी जय शिवाजीचा गजर अन् ग्रीन कोल्हापूरचा नारा देत सकाळीच चैतन्य निर्माण झालं होतं.

या रॅलीसाठी जुन्या देशी परदेशी बनावटीच्या सायकली तसेच तरुणांनी आधुनिक गेअरच्या सायकलींसह राईड पूर्ण केली.

स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.

वैविध्यपूर्ण वेशभूषा साकारत व जुन्या पूर्वीच्या लांब सीट असलेल्या सायकली घेऊन येथील एका ग्रुपने सर्वांचे लक्ष वेधत परंपरा व एकजुटीने राहाण्याचा संदेश दिला.

झाडे लावा, झाडे जगवा... निसर्ग माझी माता... मी तिची रक्षणकर्ता यांसह निसर्ग माझा सखा... असा संदेशही या रॅलीतून चिमुकल्यांनी दिला.

कोल्हापूर लोकमत आयोजित ही ग्रीन कोल्हापूर सायकल राईड सर्वांच्याच आकर्षणाचे अन् स्वच्छतेच्या जनजागृतीचा विषय ठरली.

चिमुकल्यांसह पालकांचाही उत्साह या रॅलीत दिसून आला. एका आई आपल्या मुलाला सायकवर बसवून रॅलीत सहभागी होतानाचे हे टिपलेलं छायाचित्र

स्वच्छता अन् पर्यावरण जनजागृतीचा संदेश हा रॅलीतील अशा सहभागामुळे सार्थकी लागला असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही