घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा युपी योद्धाने केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 02:50 PM2017-09-22T14:50:12+5:302017-09-22T14:53:20+5:30

गुरूवारी पाटणा पायरेट्स विरूद्ध युपी योद्धा या दोन टीममध्ये रंगलेल्या सामन्यात युपी योद्धाने दमदार विजय मिळवला.

नितीन तोमर आणि रिशांक देवाडीगाच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यूपी योद्धाजने ४६-४१ अशा फरकाने मॅच जिंकली.

सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतलेल्या उत्तर प्रदेशच्या खेळाने पाटण्याचा संघ बॅकफूटला ढकलला होता.

सामन्याच्या अखेरच्या सत्रात पाटणा पायरेट्सकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला पण तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही.