बापरे! जगातील सर्वात महागडी वेडिंग प्लॅनर; एकाचा लग्नासाठी घेते 'इतके' पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 04:20 PM2019-08-27T16:20:36+5:302019-08-27T16:23:22+5:30

सध्याच्या काळात वेडिंग प्लॅनिंग करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. ज्या कुटुंबाकडे कमी वेळ आहे आणि लग्न धुमधडाक्यात करायचं आहे त्यांच्यासाठी वेडिंग प्लॅनर पर्याय चांगला आहे. लग्न मंडप, जेवण, विद्युत रोषणाई, डिजे हे सगळं काम एक वेडिंग प्लॅनर करतो. एक अशीच वेडिंग प्लॅनर आहे साराह हेवूड, जी जगातील सर्वात महागडी वेडिंग प्लॅनर आहे.

साराह अनेक अब्जाधीश उद्योगपती आणि हॉलिवूड स्टार यांच्या लग्नासाठी वेडिंग प्लॅनर म्हणून काम करते. ब्रिटिश राजघराण्याचे प्रिंस विलियम आणि त्यांची बहिण हैरी, मेगन मर्केल यांच्या लग्नाची जबाबदारीही साराहकडे होती.

साराह एका लग्नासाठी वेडिंग प्लॅनर म्हणून 10 कोटी रूपये फी घेते. मीडिया रिपोर्टनुसार साराहने आजपर्यंत अनेक लग्न पार पाडलेत. ज्यात एका दिवसाच्या लग्नाचे बजेट 48 ते 50 कोटी आहे.

साराहची एकूण संपत्ती 165 कोटी रुपये आहे. ती एक पॅरोनॉर्मल वेडिंग शोदेखील आयोजित करते.

कोणत्याही डेस्टिनेशन वेडिंगच्या दरम्यान साराहच्या टीमसाठी 172 हॉटेल्स रूम बूक केले जातात. कमीत कमी 5 दिवस एका लग्नाच्या तयारीसाठी दिले जातात. लग्नाच्या कार्यक्रमाला लग्झरी लूक देण्यासाठी साराहची टीम मेहनत घेते.

टॅग्स :लग्नmarriage