महिलेनं जिंकली 3 अब्ज रुपयांची लॉटरी, बातमी ऐकून आली चक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:39 PM2021-07-29T16:39:57+5:302021-07-29T17:05:01+5:30

lottery : बर्लिनमध्ये एक महिला आवड्याभरापासून आपल्या पर्समध्ये लॉटरीचे तिकीट घेऊन फिरत होती. तिला माहीत नव्हते की, त्या लॉटरीची विजेता ती बनली आहे.

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला असे वाटले की एखादी लॉटरी जिंकावी जेणेकरून सर्व समस्या दूर होतील आणि आपली सर्व स्वप्ने पूर्ण करता येतील. मात्र, असे भाग्यवान लोक जगात फारच कमी आहेत.

जर्मनीच्या बर्लिनमध्ये अशी एक महिला आहे, जिचे नशिब अचानक बदलले आणि एका आठवड्यापर्यंत तिला माहीत नव्हते की, ती जवळपास तीन अब्ज रुपयांची मालकिन बनेल.

बर्लिनमध्ये एक महिला आवड्याभरापासून आपल्या पर्समध्ये लॉटरीचे तिकीट घेऊन फिरत होती. तिला माहीत नव्हते की, त्या लॉटरीची विजेता ती बनली आहे. त्या महिलेने लॉटरीच्या तिकिटातून 33 मिलियन युरो म्हणजे दोन अब्ज 90 कोटी 99 लाख 26 हजार 740 रुपये जिंकले होते.

लॉटरी अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, जर्मनीतील एक महिला 33 मिलियन युरो (39 मिलियन डॉलर) जिंकल्याचे तिकीट न समजता आठवडाभर तिच्या पर्समध्ये घेऊन फिरत होती.

लोट्टो बायर्न नावाच्या लॉटरी कंपनीच्या म्हणण्यानुसार, 45 वर्षीय महिला 9 जून रोजी सोडतीच्या एकमेव विजेता ठरल्या. तिने जर्मन लॉटरीच्या तिकिटावर सात वेगवेगळ्या क्षेत्रांचा अचूक अंदाज लावला होता.

दरम्यान, लॉटरीद्वारे अब्जाधीश झाल्यानंतर ती महिला म्हणाली, "मला आता हा विचार करून चक्कर येते की, मी निष्काळजीपणाने अनेक आठवडे माझ्या पर्समध्ये जवळजवळ 33 मिलियन युरो ($ 38,924,490) ठेवले होते."

1.20 युरोच्या लॉटरीच्या तिकिटावर क्रमांक निवडले होते आणि पुन्हा लॉटरीचे तिकीट न खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्या महिलेने सांगितले.

याचबरोबर, या महिलेने सांगितले की, "लॉटरीची रक्कम माझे पती, माझी मुलगी आणि माझ्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त आहे".

Read in English