प्रवासात तुम्हाला झोप का येते? यामागे आहेत रंजक शास्त्रीय कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:25 PM2022-05-02T16:25:57+5:302022-05-02T17:10:55+5:30

आपण प्रवासाला निघालो, गाडीत बसलो की आपल्याला झोप यायला लागते. असे का होते याचा विचार तुम्ही केला आहे का? यामागे एक शास्त्रीय कारण आहे. काय आहे हे कारण चला जाणून घेऊया...

याचे कारण शोधण्यासाठी सखोल रिर्सच झाला असून यामागे कंटाळा येणे, स्लीप डेब्ट, हायवे हिप्नोसिस अशी अनेक कारणे आहेत.

जेव्हा तुम्ही प्रवासाला निघता तेव्हा काही वस्तू मागे तर राहिली तर नाही ना? या काळजीपोटी तुमची झोप पूर्ण होत नाही.

यामुळेच गाडीत बसल्यावर आपल्याला झोप अनावर होते आणि आपण झोपतो.

जेव्हा आपण गाडीमधुन प्रवास करत असतो तेव्हा आपण काही करत नसल्यास आपल्याला झोप येते.

आपण रिलॅक्स झाल्यामुळे आपल्याला लगेच झोप येते आणि यालाच हायवे हिप्नोसिस असे म्हणतात.

चालत्या गाडीमध्ये आपल्या बॉडीची मुव्हमेट होते. याला राॅकिंग सेन्सेशन असं म्हणतात.

हे अगदी तसेच असते जशी आई लहानपणी आपल्याला पाळण्यात नाहीतर मांडीवर झुलवते

जेव्हा तुम्ही एकाच फ्लोमध्ये हलता तेव्हा त्याला राॅकिंग सेन्सेशन म्हटले जाते. यामुळे सिंक्रोनायजिंग इफेक्ट पडतो.

या सिंक्रोनायजिंग इफेक्टमुळे आपण स्लीपिंग मोडवर जाता.