In this village of India twins are born
सेम टू सेम! 'या' गावात जन्माला येतात जुळी मुलं, शास्त्रज्ञ ही झाले चकीत By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:36 PM2019-06-11T12:36:02+5:302019-06-11T12:50:48+5:30Join usJoin usNext जुळी मुलं आपण नेहमीच पाहतो. पण भारतात असं एक गाव आहे जिथे जुळी मुलंच जन्माला येतात. यामागील रहस्य कोणालाच माहीत नाही. शास्त्रज्ञ ही यामुळे चकीत झाले आहेत. (फोटो - www.thenewsminute.com) केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावात जुळी मुलं जन्माला येतात. (फोटो - www.thenewsminute.com) कोडिन्ही गावाला 'व्हिलेज ऑफ ट्विंस' आणि 'ट्वीन टाउन' असं म्हटलं जातं. जगभरात 1000 मुलांमध्ये 4 जुळी मुलं जन्माला येतात. मात्र या गावात 1000 मुलांमध्ये 45 जुळी मुलं जन्माला येतात. (फोटो - www.thenewsminute.com) जुळ्या लोकांबद्दल असलेल्या रेकॉर्डचा विचार केल्यास केरळमधील हे गाव जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आशियामध्ये पहिला क्रमांक लागतो. मलप्पूरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावाची लोकसंख्या ही जवळपास 2000 आहे. या गावात घर, शाळा, बाजार, रुग्णालयात सर्व जुळी मंडळीच दिसतात. जुळी मुलं जन्माला येण्यामागे अनुवंशिक कारण असल्याचं म्हटलं जातं. टॅग्स :केरळKerala