विमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय? मग, या टिप्सकडे जरूर लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 04:13 PM2020-02-10T16:13:45+5:302020-02-10T16:23:54+5:30

सध्या प्रवास हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय...या-ना-त्या कारणानं प्रत्येक जण प्रवास करत असतोच. यामध्ये विमान प्रवास सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, असं असलं तरी अनेक जण विमानानं प्रवास करतात. तर विमान प्रवास म्हटलं अनेकांना भीतीनेच पोटात गोळा येतो किंवा पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होतात. त्यामुळे पुढील टिप्सकडे जरूर लक्ष द्या....

- विमान टेकऑफ करण्याच्याआधी एक ते दीड तास लवकर विमानतळावर पोहोचावे. कारण, विमानतळावर चेकिंगला वेळ लागतो.

- विमानाचं तिकीट आणि त्याची प्रिंटआऊट सोबत ठेवा, फक्त मोबाईलवर आलेला SMS पुरेसा नसतो.

- आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा वोटिंग कार्ड यापैकीत काहीही ओळखपत्र म्हणून सोबत ठेवा.

- विमानतळावर गेल्यानंतर विमानानं प्रवास करण्यासाठी फक्त तिकिटाची गरज नाही, तर तुम्हाला त्याठिकाणी जाऊन बोर्डिंग पास घ्यावा लागतो.

- बोर्डिंग पासशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. यासाठी संबंधित विमानाच्या काऊंटर जाऊन आपलं तिकीट दाखवून बोर्डिंग पास घ्या.

- यानंतर चेक इन काऊंटरवर तुम्हाला बोर्डिंग पास आणि आयकार्ड दाखवावं लागतं.

- हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला विमानात प्रवास करता येणार आहे.