हे जगातले १० सर्वात महागडे घटस्फोट, सेटलमेंटच्या रकमा वाचून बोलती होईल बंद....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 12:57 PM2021-05-05T12:57:33+5:302021-05-05T13:18:16+5:30

World Costliest Divorce : बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांच्या पती मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी २७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाची घोषणा केली. अशात जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांची चर्चा सुरू झाली.

जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पती मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाची घोषणा केली. अशात जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांची चर्चा सुरू झाली. बिल गेट्स यांच्याकडे १३० अबर डॉलरची इतकी संपत्ती आहे. त्यामुळे यांच्यातही संपत्ती कशी वाटली जाणार हे अजून स्पष्ट झालं नाही. मात्र, बिल-मेलिंडा गेट्स यांनी आधीच त्यांची ९५ टक्के संपत्ती समाजसेवेसाठी दान करण्यात येण्याची घोषणा केली होती. अशात आज आपण जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांवर एक नजर टाकूया.

Amazon चे संस्थापक जेफ बेजॉस यांनी पत्नी मॅकेंजीला घटस्फोट दिला. या दोघांचा घटस्फोट जगातला सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. जेफ बेजॉस यांनी पत्नीला जगातील सर्वात महाग असा घटस्फोट दिला. जेफ यांनी पत्नी मॅकेंजी यांना २.७५ लाख कोटी इतके रुपये दिले होते.

फ्रान्स वंशाचे अमेरिकी व्यापारी आणि आर्ट डीलर एलक विलडनस्टीनने लग्नाच्या २४ वर्षानंतर पत्नी जॉसलीन विलडनस्टीनला घटस्फोट दिला होता. या घटस्फोटाची सेटलमेंट ३.८ बिलियन डॉलर म्हणजे २६७ अब्ज, ८४ लाख कोटी आणि ३० लाख इतक्यात झालं होतं.

मीडिया मुगल रूपर्ट मर्डोक आणि पत्रकार एना टॉर्ब यांनी ३१ वर्षे संसार केला. त्यांना तीन मुलंही झाली. १९९८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यावेळी १.७ बिलियन डॉलर म्हणजे ११९ अब्ज, ८२ कोटी आणि ४५ लाखात सेटलमेंट झाली होती.

यूनायटेड किंगडमच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बर्नी एकलिस्टन आणि क्रोशियाची मॉडल स्वेलिका रेडिएक यांच्यात २००९ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांची सेटलमेंट कितीत झाली याचे डीटेल्स बाहेर येऊ शकले नाही. मात्र, एका अंदाजानुसार, ही सेटलमेंट १.२ बिलियन डॉलर म्हणजे ८४ अब्ज आणि ५७ कोटी रूपयात झाली होती.

लास वेगासमधील मोठे कसिनो व्यापारी स्टीव आणि एलन वीन यांनी एकदा नाही तर दोनदा लग्न केलं. पहिल्यांदा त्यांनी १९६३ ते १९८६ पर्यंत पती-पत्नी होते. नंतर १९९१ ते २०१० पर्यंत होते. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला तो फार महागडा झाला. एका अंदाजानुसार, यांची सेटलमेंट १ बिलियन डॉलर म्हणजे आताच्या हिशेबाने ७० अब्ज, ४८ कोटी आणि ५० लाखात झाली होती

मोठे तेल व्यापारी हॅरल्ड हॅम आणि त्यांच्या पत्नीत घटस्फोटाची सेटलमेंट ९७४.८ मिलियन डॉलर म्हणजे आताच्या हिशेबाने ६८ अब्ज, ६५ कोटी आणि २३ लाख रूपयात झाली होती.

१९६१ मध्ये सौदी अरबचे शस्त्रांचे व्यापारी अदनान खशोगीने २० वर्षीय ब्रिटीश तरूणी सांद्रे डेलीसोबत लग्न केलं होतं. डेलीने नंतर धर्म परिवर्तन केला आणि ती सुराया झाली. १९७४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यावेळी सेटलमेंट म्हणून ८७४ मिलियन डॉलर म्हणजे आताच्या हिशेबाने ६१ अब्ज, ५९ कोटी आणि ५१ लाख रूपये तिला मिळाले होते.

एलीना रेबलवलेनने रशियाचे उद्योगपती दमित्री रेबलवलेवपासून घटस्फोट घेण्यासाठी केस केली होती. तिने दमित्रीवर दगा दिल्याचा आरोप केला होता. कोर्टाने आधी २०१४ मध्ये सेटलमेंट म्हणून ४.५ बिलियन डॉलर देण्याचा आदेश दिला होता. मात्र, एका अपीलनंतर तिला केवल ६०४ मिलियन डॉलर मिळाले होते. आताच्या हिशेबाने ही रक्कम ४२ अब्ज, ५६ कोटी आणि ६९ लाख रूपये इतकी होते.

सेलफोन इंडस्ट्रीतील मोठं नाव क्रेक मॅककॉ आणि न्यूजपेपर पब्लिशर वेंडी मॅककॉ यांच्यात १९९७ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांच्यात सेटलमेंटची रक्कम ४६० मिलियन डॉलर म्हणजे आताच्या हिशेबाने ३२ अब्ज, ३९ कोटी ५५ लाख इतकी होती.

मेल गिब्सन आणि रोबिन मोर यांचा घटस्फोट २००६ मध्ये झाला होता. त्यांच्यात ४२५ मिलियन डॉलरमध्ये सेटलमेंट झाली होती. ४२५ मिलियन डॉलर म्हणजे आताच्या हिशेबाने ही रक्कम २९ अब्ज, ९० कोटी, ९३ लाख रूपये इतकी होते.

बॉन जॉनसन आणि शीला जॉनसन यांनी टेलिव्हिजन नेटवर्कची सुरूवात केली होती. त्यानंतर ते जगातील पहिले आफ्रिकी-अमेरिकन अब्जाधीश ठरले होते. त्यांचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. यावेळी सेटलमेंट म्हणून त्यांनी ४०० मिलियन डॉलर म्हणजे २८ अब्ज, १६ कोटी आणि ४२ लाख रूपये दिले होते.

Read in English