'हा' आहे, जगातील सर्वात लहान देश!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 04:23 PM2020-02-22T16:23:37+5:302020-02-22T16:29:21+5:30

जगात मुंबईपेक्षा लहान देश आहेत, ज्यांचे क्षेत्रफळ प्रचंड कमी आहे.

असाच एक सर्वात लहान देश म्हणजे व्हॅटिकन सिटी.

याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड मोठी आहे.

या देशाची क्षेत्रफळानुसार भारताशी तुलना केली तर भारतातील एखाद्या राज्यातील एका जिल्ह्याच्या आकाराएवढा आहे.

व्हॅटिकन सिटीचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे.

येथील लोकसंख्या 800 इतकी आहे.

या देशात काम करणाऱ्या लोकांची एकूण संख्या जवळपास 1000 असल्याचे सांगण्यात येते.

यातील बहुतेक लोक दुसऱ्या देशातील नागरिक आहेत.

व्हॅटिकन सिटीमध्ये बऱ्याच अलिशान इमारती आहे.

याचबरोबर, युरोपातील मोनाको जगातील दुसरा सर्वात लहान देश आहे.