पारदर्शक कारभार; पाण्याच्या संपर्कात येताच फुलातून सर्वकाही दिसतं आरपार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:08 PM2019-04-18T19:08:30+5:302019-04-18T19:25:34+5:30

सर्वसामान्य फुलासारखं दिसणारं डिपहिल्लेया ग्रे हे फूल अतिशय अनोखं आहे. कारण पाण्याच्या संपर्कात येताच हे फूल पारदर्शक होतं.

जपानच्या डोंगरात भागात आढळून येणारं हे फूल 'स्केलेटन फ्लॉवर' म्हणून ओळखलं जातं. वसंत ऋतूत हे फूल उमलतं. पांढऱ्या रंगाच्या या फुलावर पाणी टाकल्यास किंवा पाऊस पडल्यास ते पारदर्शक होतं.

पावसाची रिपरिप सुरू होताच पारदर्शक होणारं हे फूल पाऊस थांबताच पुन्हा पांढऱ्या रंगाचं होतं.

फुलांच्या पाकळ्यांमधल्या कोशिकांच्या संरचनेमुळे हा प्रकार घडतो.

रंग बदलण्याची क्षमता असल्यानं स्केलेटन फ्लॉवर सर्वसामान्यांसह विज्ञानप्रेमींनाही आकर्षित करतं.

हे फूल पारदर्शक होताच पाकळ्यांमधल्या रेषा नस आणि हाडांसारख्या दिसतात. त्यामुळेच या फुलाला स्केलेटन फ्लॉवर म्हणतात.