आश्चर्य! आफ्रिकेत सापडली ७८ हजार वर्ष जुनी रहस्यमय कब्र; समोर आले दुर्मिळ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 01:32 PM2021-05-07T13:32:32+5:302021-05-07T13:53:34+5:30

Oldest human burial site : या गुहेत सापडलेल्या सगळ्या वस्तूंचे मायक्रोस्कोपिकच्या आधारे अध्ययन करण्यात आले.

अनेकदा पृथ्वीच्या आत लपलेल्या काही वस्तू किंवा रहस्य अचानक सापडतात. अनेकदा या वस्तूंच्या किमती खूप जास्त असतात. अशा वस्तू सापडणं संशोधनाच्या दृष्टीकोनातून फार महत्वाचे असते. अशीच एक घटना आफ्रिकेच्या केन्यातून समोर आली आहे. या ठिकाणी खूप जुनी कब्र सापडली आहे.

सायंस डेलीनं दिलेल्या रिपोर्टनुसार ही कब्र केन्या परिसरातील एका गुहेत दिसून आली आहे. या कबरी व्यतिरिक्त अनेक पुरातन आभूषण, नकाशे, अवशेष सापडले आहेत. ही कब्र ७८ वर्ष जुनी असल्याचा दावा केला जात आहे.

रिपोर्ट्सनुसार ही एका लहान मुलीची कब्र असल्याचं सांगितलं जात आहे. या ठिकाणी सापडलेल्या इतर वस्तूंना खूप व्यवस्थित एका कापडात गुंडाळून ठेवलं आहे. एखाद्या उशीपमाणे वस्तू सापडली आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की, या उशीवर या मुलीचे डोके ठेवले असावे.

या गुहेत सापडलेल्या सगळ्या वस्तूंचे मायक्रोस्कोपिकच्या आधारे अध्ययन करण्यात आले. त्यातून असा दावा केला जात आहे की, ही कब्र जवळपास ७८ हजार वर्ष जुनी आहे.

. पुरातत्व विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या कबरीतील काही नमुने स्पेनमध्ये पाठवण्यात येणार आहेत.

स्पेनच्या बुरगोसमधील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन ह्यूमन सेंटर ऑफ इवोल्यूशनचे संचालक मारिया मार्टिनोन टोरेस यांनी सांगितले की, या समुदायात अंतिम संस्काराच्या परंपरांना मानलं जात होतं.

Read in English