Nusrat Jahan love story : कशी होती नूसरत जहां आणि निखिल जैनची लव्हस्टोरी? फिल्मी स्टाइल झाली पहिली भेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:50 PM2021-06-09T15:50:48+5:302021-06-09T16:06:24+5:30

Nusrat Jahan and Nikhil Jain love story : नुसरत जहां आणि निखील जैन यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर ती काही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. नुसरत आणि निखीलची पहिली भेट फिल्मी स्टाइलनेच झाली होती.

बंगाली सिनेमांच्या अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां आणि त्यांचे पती निखील जैन यांच्यातील वाद समोर आल्यावर दोघांकडूनही खळबळजनक आरोप केले जात आहेत. नुसरत जहां या पतीपासून वेगळ्या राहत असून त्यांनी त्यांचं लग्न भारतात कायदेशीर नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी तुर्कीत लग्न केलं होतं जे भारतात बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं. अशात दोघांची पहिली भेट कशी झाली होती? त्यांची लव्हस्टोरी कशी होती? याचीही चर्चा होत आहे.

नुसरत जहां आणि निखील जैन यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर ती काही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. नुसरत आणि निखीलची पहिली भेट फिल्मी स्टाइलनेच झाली होती.

झालं असं होतं की, काही वर्षाआधी निखील जैनने दुर्गा पूजेवेळी एक साडीचं स्टोर उघडलं होतं. त्यांची इच्छा होता की, या स्टोरचं उद्घाटन एखाद्या अभिनेत्री किंवा मॉडलने करावं.

अशात त्यांच्या मार्केटींग टीमने त्यांना नुसरत जहां यांचं नाव सुचवलं. निखील बंगाली सिनेमे बघत नव्हते. त्यामुळे ते नुसरत जहांला ओळखत नव्हते.

निखीलसमोर जेव्हा लिस्ट आली तर त्यात सर्वातआधी नुसरत यांचं नाव होतं. नुसरत यांच्याबाबत माहिती घेतल्यावर त्यांनी निर्णय घेतलं की, नुसरत याच त्यांच्या ब्रॅंडचं शूट करतील. जेव्हा नुसरत ब्रॅंडच्या शूटसाठी गेल्या तेव्हा निखील आणि नुसरत यांची पहिली भेट झाली.

शूट झाल्यावर निखीलने नुसरत जहांसोबत सेल्फीही काढला होता. इथू पुढे दोघांची मैत्री झाली आणि ते पुन्हा पुन्हा भेटू लागले. एका मुलाखतीत नुसरत यांनी सांगितले होते की, त्यांना असं वाटत होतं की, निखील फारच कॅसेनोवा टाइपचा माणूस आहे. नुसरत म्हणाल्या होत्या की, मला त्यांच्याबाबत वाईटही सांगितलं गेलं होतं.

पण जेव्हा त्या निखील यांना भेटल्या तेव्हा ते तसे वाटले नाही. नुसरत यांनी असंही सांगितलं होतं की, जेव्हा त्या निखील यांना भेटल्या तेव्हा त्या फार वाईट स्थितीतून जात होत्या. मात्र, निखीलने त्या वाईट काळात त्यांची साथ दिली.

निखील जैन यांनीच नुसरत जहां यांना आपल्या मनातील भावना सांगितल्या होत्या. निखील यांनी आपल्या वाढदिवशी नुसरत यांना प्रपोज केलं हतं. निखील पार्टीनंतर नुसरत यांना घरी सोडायला जात होते.

तेव्हा त्यांनी गाडी खराब झाल्याचं नाटक केलं आणि गाडीतून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी गुडघ्यावर बसून खिशातून अंगठी काढली आणि नुसरत यांना प्रपोज केलं. नुसरत यांनीही लगेच होकार दिला.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यावर नुसरत जहां यांनी लग्नाची घोषणा केली होती. त्यानंतर १९ जूनला त्यांनी तुर्कीमध्ये लग्न केलं. दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

लग्नानंतर त्या हिंदू धर्माच्या नवरीसारख्या सजल्या होत्या त्यामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. शपथ घेतानाचे त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते.

आता नुसरत जहाँ भलत्याच एका कारणामुळं चर्चेत आहे. काही रिपोर्टसच्या दाव्यानुसार नुसरत जहाँ या ६ महिन्याची गर्भवती (Nusrat Jahan Pregnant) आहेत आणि त्यांचे पती निखील जैन(Nikhil Jain) यांना त्या गर्भवती असल्याची माहितीच नाही.

दरम्यान, या सर्व वादानंतर त्यांनी एक स्टेटमेंट जारी करत आपला विवाह आणि त्यानंतर आपल्या बँक खात्यात करण्यात आलेल्या छे़डछाडीबद्दल खुलासा केला आहे. निखिल जैन यांनी त्यांच्या माहितीशिवाय खात्यातून पैसे काढल्याचा आरोप नुसरत जहाँ यांनी केला आहे.

"जी व्यक्ती स्वत:ला श्रीमंत म्हणवते आणि मी त्याचा वापर केल्याचं म्हणते तो रात्रीअपरात्री कोणत्याही वेळी गैर-कायदेशीररित्या माझ्या खात्यातून पैसे काढून घेतो. आम्ही वेगळे राहत असल्यानंतरही ही सुरूच आहे. मी बँकिंग अथॉरिटीला यापूर्वीच सांगितलं होतं आणि लवकरच पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली जाईल," असं नुसरत जहाँ म्हणाल्या.

यापूर्वीही त्यांच्या आग्रहाखातर माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या बँक खात्याचे डिटेल्स त्यांना देण्यात आले होते परंतु त्यानंतर बँकेला आमच्या बॅक खात्यांबद्दस देण्यात आलेल्या निर्देशांची ना मला आणि माझ्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. माझ्या माहितीशिवायच निराळ्या खात्यात पैशांचा चुकीचा वापर सुरू होता. सध्या बँकेशी यासंदर्भात बोलणीही सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं.

"माझं जे काही होतं, माझे, कपडे, बॅग, अॅक्सेसरीज ते सर्व त्यांच्याकडेच आहे. माझे वडिलोपार्जित दागिने, जे मला माझ्या कुटुंबीयांनी, नातेवाईंकांनी दिले होते, माझ्या मेहनीच्या कमाईतून जे काही घेतलं होतं, तेदेखील त्यांच्याकडेच आहे," असं नुसरत जहाँ म्हणाल्या.