एअपोर्ट वेटिंग एरिया नाही, आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलही नव्हे हे तर रेल्वेस्टेशन, कोणते? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 06:37 PM2021-09-17T18:37:29+5:302021-09-17T20:14:56+5:30

रेल्वेस्टेशन त्यातही बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे म्हटल्या की गर्दी, लोकांच्या बॅगा, गजबलेले डबे, घामाचा नकोसा करणारा वास. तेथील रेस्टरुम मध्ये आराम करायचा म्हटलं तर तिकडचा परिसरच अतिशय घाणेरडा असतो. जेवायचं म्हटलं तर कळकट्ट कपड्यांमधले ते रेल्वेच्या कँटीनमधले वेटर पाहुन जेवण जेवायची इच्छाच होत नाही. पण यापासुन आता सुटका मिळणार आहे. एका रेल्वेस्टेशननं त्याचा विमातळासारखा कायापालट केलाय...

अनेकदा आपण मोठा प्रवास करून जेव्हा रेल्वे स्टेशनवर उतरतो, तेव्हा आपल्याला इच्छित स्थळी जाण्यापूर्वी थोडं फ्रेश व्हावंसं वाटतं. कुठेतरी अंघोळीची आणि गरमागरम नाश्त्याची सोय झाली, तर किती बरं होईल, असा विचार मनात येतो.

मनातला हा विचार आता दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पूर्ण होणार आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर अलिशान लाऊंज (Lounge) तयार करण्यात आलं आहे.

IRCTC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणेच दिल्ली रेल्वे स्टेशनवरील लाऊंज तयार करण्यात आले आहे.

प्रवास सुरु करण्यापूर्वी आणि प्रवास संपल्यानंतर याचा वापर प्रवाशांना करता येणार आहे.

पहिलं पॅकेज १५० रुपये अधिक जीएसटी असं आहे. त्यात तुम्हाला १ तास लाऊंजमध्ये थांबण्याची सुविधा मिळेल. त्या दरम्यान तुम्ही वायफायचाही उपयोग करू शकता. त्याचप्रमाणे चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स कॉम्पिमेंटरी स्वरुपात दिले जाणार आहेत.

इथं प्रवाशांना चॅलन म्युझिकची सुविधा पुरवण्यात आली आहे. या ठिकाणी वायफाय, वर्तमानपत्र आणि मासिकं यांचा आनंद पर्यटक घेऊ शकतील.

विमातळावर ज्याप्रमाणे विमानांचे तपशील दिसतात, त्याचप्रमाणे लाऊंजमधून प्रवाशांना त्यांच्या रेल्वेच्या येण्याजाण्याच्या सूचना मिळू शकणार आहेत. या ठिकाणी आरामखुर्च्या आणि रिक्लायनर्स लावण्यात आले आहेत.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वरील पहिल्या मजल्यावर हा अलिशान लाऊंज तयार करण्यात आला आहे.

या लाऊंजमध्ये बिझनेस सेंटरही उभारण्यात आलं आहे. लाऊंजमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

तिकीट असलेला कुठलाही प्रवासी याचा वापर करू शकतो.

Read in English