'या' जंगलाला भेट देण्याचा विचारही करु नका, कारण इथे गेलेला कधीच परत येत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:48 PM2021-10-22T18:48:38+5:302021-10-22T19:22:37+5:30

जगात अशी अनेक भीतीदायक ठिकाणे आहेत जिथे लोक जाण्यास किंवा राहण्यास घाबरतात. रोमानियाचे होईया बासिऊ फॉरेस्ट हे देखील असंच एक जंगल आहे. हे जगातील सर्वात भयानक जंगल असल्याचे म्हटले जाते. असे म्हणतात की, जो या जंगलात प्रवेश करतो तो परत कधीच येत नाही.

होया बसू', जगातील सर्वात भीतीदायक जंगलांपैकी एक मानले जाते, ते ट्रांसिल्वेनिया प्रांतातील क्लूज काउंटीमध्ये आहे. जंगलात घडणाऱ्या गूढ घटना पाहता त्याला 'ट्रान्सिल्वेनियाचा बर्म्युडा ट्रँगल' असे म्हटले गेले आहे.

या जंगलातील झाडे आडवी आणि वक्र दिसतात, जी उन्हातही खूप भीतीदायक दिसतात.

लोक या गूढ जागेला युएफओ UFOs आणि भुतांशी देखील जोडतात. या भागात एक मेंढपाळ बेपत्ता झाल्यावर या जंगलाविषयी लोकांची भीती आणखीनच वाढली.

असे म्हटले जाते की, प्रथम एक माणूस जंगलात शिरताच गायब झाला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी 200 मेंढ्याही त्याच्यासोबत होत्या. त्यांचाही काही पत्ता लागला नाही.

तेव्हापासून या जंगलात जो आत जातो तो परत येत नाही.

काही वर्षांपूर्वी एका लष्करी अधिकाऱ्याने या जंगलात उडती तबकडी पाहिली होती.

हे जंगल ७०० एकरमध्ये पसरलेले असून, सांगण्यात येते की, येथे शेकडो लोक गायब झाली आहेत.

एका कथेनुसार, १९८० मध्ये येथील गावातील एका शेतकऱ्याची मुलगी जंगलात गायब झाली होती. मात्र आश्चर्यकारकरित्या ती ५ वर्षांनी परत आली. मात्र ती सर्व विसरली होती. काही दिवसांनी लगेच तिचा मृत्यू झाला.

१९६८ ला एका महिलेने आकाशात एलियन पाहिल्याचा दावा केला होता.

येथे आलेले अनेक पर्यटकही त्यांना विचित्र अनुभव आल्याचे सांगतात.