900 वर्षांआधी अनेक महिने अचानक गायब झाला होता चंद्र, आता उलगडलं 'या' घटनेचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:38 PM2020-05-12T12:38:54+5:302020-05-12T12:57:03+5:30

या घटनेचं कारण वैज्ञानिकांनी आता शोधून काढलं आहे. अनेक वर्षांच्या शोधानंतर हे शक्य झालं आहे. चला जाणून घेऊ चंद्र एकाएकी गायब होण्याचं कारण...

तुम्ही वेगवेगळ्या कथांमध्ये ऐकलं असेल की, चंद्र गायब झाला होता. अनेक रात्री चंद्र दिसलाच नाही. मात्र, हे केवळ कथांमध्येच नाही तर प्रत्यक्षातही घडलं होतं. 910 वर्षांपूर्वीची ही घटना आहे जेव्हा चंद्र अनेक महिने दिसलाच नव्हता.

या घटनेचं कारण वैज्ञानिकांनी आता शोधून काढलं आहे. अनेक वर्षांच्या शोधानंतर हे शक्य झालं आहे. चला जाणून घेऊ चंद्र एकाएकी गायब होण्याचं कारण...

910 वर्षाआधी अनेक महिने पृथ्वीवर केवळ रात्र होती. दिवसाचा प्रकाश तर माहीत पडत होता, पण रात्री चंद्र दिसतच नव्हता. हे झालं होतं पृथ्वीमुळे. हे का झालं होतं या गोष्टीने वैज्ञानिकांना हैराण करून सोडलं होतं.

स्वित्झर्लॅंडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ जेनेव्हाच्या वैज्ञानिकांनी याचा शोध लावला की, असं कसं झालं होतं. त्यांना असं आढळून आलं की, 1104 मध्ये आइसलॅंडच्या हेकला या ज्वालामुखीमध्ये मोठा विस्फोट झाला होता. त्यानंतर त्यात सतत छोटे छोटे विस्फोट होत राहिले.

ज्वालामुखी हेकलामध्ये झालेल्या स्फोटांमुळे मोठ्या प्रमाणात सल्फर गॅस आणि राख बाहेर पडली होती. सल्फर गॅस आणि राख हिवाळ्यामुळे वेगाने हवेत मिश्रित झाली. हळूहळू चार वर्षात याने पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फीअरला झाकलं. त्यामुळे पृथ्वीवर सगळेकडे अंधारच होता. (Image Credit : express.co.uk)

1108 ते 1113 पर्यंत पृथ्वीवर काही महिने दिवसा थोडा प्रकाश दिसत होता. पण रात्री आणखी जास्त काळोख व्हायचा. पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्याहून चंद्र दिसत नव्हता. याचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांना फारच मेहनत घ्यावी लागली. (Image Credit : express.co.uk)

आता या हेकला ज्वालामुखीबाबत जरा जाणून घेऊ. हेकला ज्वालामुखीला नरकाचं द्वार म्हटलं जातं. या ज्वालामुखीमुळेच जगभरात सल्फर कणांचा थर तयार झाला होता. ज्याचे पुरावे आजही मिळतात.

हेकला ज्वालामुखी आयसलॅंडच्या दक्षिणेत आहे. हा येथील काही सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. सन 874 पासून ते आतापर्यंत साधारण 20 वेळा या ज्वालामुखीचा विस्फोट झालाय. शेवटचा या ज्वालामुखीचा 26 फेब्रुवारी 2000 ला विस्फोट झाला होता.

हा ज्वालामुखी सामान्यपणे बर्फाने झाकलेला असतो. याची उंची 4883 फूट इतकी आहे. हा फार जास्त जमिनीवर तयार झालेला ज्वालामुखी आहे. म्हणजे याच्या खाली लाव्हारसाने भरलेला 5.5 किलोमीटर लांब थर आहे.

असेही म्हणता येईल की, हा एक मोठा घाट आहे आणि या घाटाची खोली 4 किलोमीटर आहे. ज्यात केवळ लाव्हारस भरलेला आहे. (Image Credit : irishtimes.com)

1104 मध्ये जेव्हा याचा विस्फोट झाला होता तेव्हा काही दिवसात याच्या राखेने अर्धा आइसलॅंड कव्हर झाला होता. म्हणजे 55 हजार वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रात केवळ राखच राख होती. याच्या लाव्हारसाने आणि मॅग्माने आजूबाजूच्या गावांची राख झाली होती.