जिद्दीला सलाम! एका पाय नसूनही बॉडीबिल्डींगमध्ये कमावतीये नाव, कधी देत नव्हते कुणीही नोकरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 12:26 PM2021-01-09T12:26:31+5:302021-01-09T12:34:59+5:30

गुईला ही गोष्ट आठवतही नाही की, शाळेत जात असताना तिला एका ट्रकने धडक दिली होती. ज्यात तिने पाय गमावला होता.

वेगळं काही करू पाहणारे लोक जग काय म्हणेल याचा विचार करत बसत नाहीत. ते फक्त हाच विचार करत असतात की, त्यांना सतत काहीतरी करायचं आहे. ते त्यांच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि त्यात त्यांना यशही मिळतं. अशीच आहे ३५ वर्षीय Gui Yuna. ती चीनची राहणारी आहे. दिव्यांग आहे. तिला एक पायच नाही. तरी सुद्धा बॉडीबिल्डींगसारख्या क्षेत्रात आपलं नाव कमावते आहे.

२००४ मध्ये तिने एथेंसमध्ये झालेल्या पॅरा ऑलंम्पिकमध्ये भाग घेतला होता. बॉडीबिल्डींगच्या क्षेत्रात ती नवीन होती. तरी तिने यात विजेतेपद मिळवलं. नुकताच तिने IWF Beijing २०२० मध्ये सहभाग घेतला होता. यात तिने हाय हील शूज घातले होते आणि बिकीनीत दिसली होती. लोक तिच्या व्यक्तित्वाने प्रभावित झाले होते.

ती म्हणाली होती की, 'याची शक्यता आहे की, मी पहिला क्रमांक आपल्या मसल्स आणि प्रोफेशनलिज्मने मिळवला असेल. पण स्टेजवर मी सर्वांसमोर माझ्या आत्मविश्वासाने आणि साहसाने उभी होते'.

गुई चीनच्या Nanning ची राहणारी आहे. तिच्या आईने तिचा सांभाळ केला. वडिलांचं निधन तिच्या जन्माआधीच झालं होतं. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला फार मेहनत करावी लागली. २००१ मध्ये तिने Paralympic खेळांमध्ये खेळणं सुरू केलं होतं.

Shanghai gym मध्ये ती रोज तासंतास वर्कआउट करते. टिकटॉकवर तिचे २००,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

गुईला ही गोष्ट आठवतही नाही की, शाळेत जात असताना तिला एका ट्रकने धडक दिली होती. ज्यात तिने पाय गमावला होता.

२००८ मध्ये बीजिंग समर गेम्स आणि पॅरालाम्पिक झाले होते. त्यात गुईने हाय जंप आणि आर्चरीमध्ये भाग घेतला होता.

तिने सांगितले की, नोकरीसाठी तिने २० कंपन्यांमध्ये अर्ज केला होता. सर्वांनी तिला नाकारलं होतं. ती म्हणाली की, 'अशा लोकांना मी काय म्हणू. त्या लोकांमुळे मला कठिण काळातून जावं लागलं होतं. त्यामुळेच मी आज जे आहे ती बनू शके'.

Read in English