बाबो! वर्षाला करोडो रुपयांची दारू पितात किम जोंग; जगभरातील बँकांमध्ये खाते, जाणून घ्या रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:18 PM2020-06-16T15:18:09+5:302020-06-16T15:39:21+5:30

किम जोंग उन उत्तर कोरियाचे प्रमुख आहे. उत्तर कोरिया या देशाचा रहस्यमय देशांमध्ये समावेश होतो. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या वैयक्तीक आयुष्याबाबत अनेक सिक्रेट्स आहेत. कारण जगातील श्रीमंत माणसांमध्ये त्यांचाही समावेश होतो. मालमत्तेचा अहवाल ठेवणारी संस्था द स्काउंडर आणि यूएनच्या रिपोर्टनुसार किम यांच्याकडे 2018 मध्ये १० बिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम होती.

३६ वर्षीय किम जोंग उन यांची जास्तीत जास्त कमाई आफ्रिकेतून उत्तर कोरियात अवैधरित्या येत असलेल्या हस्तीदंत, दारू, हत्यारंस ड्रग्स यांच्या विक्रीतून होते.

जगभरातील मध्य अमेरिका, यूरोप आणि आशियातील बँकांमध्ये यांची वेगवेगळ्या नावांनी खाती आहेत. २०१३ मध्ये एका तपासणीदरम्यान दिसून आलं की, उत्तर कोरियातील बॅकांमध्ये दोनशेपेक्षा जास्त खाती अशी आहेत. ज्यातील पैसै हे अपहरण, हत्यारांची विक्री यातून मिळवलेले आहेत.

किम दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. दरवर्षी स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर किम 600 मिलियन डॉलर म्हणजेच ४०५ कोटी रुपयांचा खर्च करतात. इतकंच नाही तर २० कोटींचा खर्च दारू पिण्यावर करतात.

उत्तर कोरियातून इतर देशात पलायन केलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे स्वतःची जहाजं, बेटं आणि रिसॉर्ट्स आहेत. या ठिकाणी जाऊन किम पार्टीज करतात.

ब्रिेटनच्या माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार किम यांच्याकडे बुलेटप्रूफ मर्सीडिज कार आहेत. या शिवाय माहागडे घोड्यांची. वाद्याची त्यांना आवड आहे. त्याचं प्रमुख निवासस्थान प्योंगयांग या ठिकाणी आहे. तिथेच हजार सीट असलेले एक सिनेमागृह आहे.

दुसरीकडे कोरियातील सर्वसामान्य जनता गरिबीचे दिवस काढत वर्षानुवर्षे जगत आहे. त्यांना दोन वेळचे अन्नही व्यवस्थित मिळत नाही.

दुसरीकडे कोरियातील सर्वसामान्य जनता गरिबीचे दिवस काढत वर्षानुवर्षे जगत आहे. त्यांना दोन वेळचे अन्नही व्यवस्थित मिळत नाही. युएनएच्या रिपोर्टनुसार २०११ मध्ये किम यांनी परदेशातून ३०० मिलियन डॉलरची खरेदी केली होती. तर पुढील वर्षी हा खर्च दुप्पट करण्यात आला होता.