अंबानीपुत्राचा थाटमाट, जाणून घ्या आकाशची लाईफस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:19 PM2019-03-07T16:19:15+5:302019-03-07T16:25:28+5:30

अंबानीपुत्र आकाश आणि श्लोका यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला. देशातील या सर्वात श्रीमंत बापाच्या मुलाचं लाईफस्टाईल कसंय हे जाणुया.

आकाश हा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा असून त्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. तर पदवीचे शिक्षण अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात घेतले.

आकाश हे क्रिकेटसह सॉकरचेही मोठे चाहते आहेत. तर इंग्लिश प्रिमियर पाहणेही आकाशचा छंद आहे. आकाश अमेरिकेतच राहू इच्छित होते, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना भारतात येण्याचा आग्रह केला.

आकाश यांनी नुकतेच स्वित्झर्लंडच्या सेंट मोरिट्ज येथे तीन दिवसीय प्री वेडिंग पार्टी केली. ज्यामध्ये रॉकबँड कोल्डप्ले आणि अमेरिकन डीजे द चेनस्मोकर्स हेही सहभागी झाले होते.

इंटरनेटचा वापर माहिती घेण्यासाठी अन् अभ्यासासाठी करायलाच आकाश यांना आवडते. त्यांचे हे विचार सव्वाशे कोटी भारतीयांपर्यंत पोहोचविण्याचा सल्ला पिता मुकेश यांनी आकाशला दिला आहे.

आपल्या आठवणी जपायलाही आकाश यांना आवडते, त्यांच्याकडे आर्सेनलजी जर्सी आहे. तर 1983 साली सुनिल गावस्कर यांनी वर्ल्डकप खेळताना वापरलेली बॅटही आहे.

आकाश अंबानी यांना कारचाही मोठा शौक आहे. त्यांच्याजवळ बेंटले बेंटगाया, रेंज रोवर, वोग आणि रॉल्स रायस, फँटम ड्रापहेड काऊपे या गाड्या आहेत.