Kim Jong : १ वर्षानंतर समोर आली किम जोंग यांची पत्नी; कुठे होती, नक्की काय करत होती, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:13 PM2021-02-17T14:13:05+5:302021-02-17T14:29:51+5:30

Kim Jong Un's wife : किम जोंग यांनी आपल्या पत्नीला सभागृहात आणलं तेव्हा वेगळ्याच प्रकारचा गडगडाट ऐकू आला. अनेकांनी या दोघांचे स्वागत केले.

उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग ऊन यांची पत्नी तब्बल एका वर्षानंतर जगासमोर आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमातून किम यांच्या पत्नीविषयी चर्चांना उधाण आलं होतं.

किम जोंग यांची पत्नी री सोल जू उत्तर कोरियाचे पूर्व हुकूमशाहा किम जोंग २ यांच्या वाढदिवसाला आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित होती.

किम जोंग यांची पत्नी री सोल जू एका वर्षानंतर सगळ्यांच्या समोर आली आहे. री सोल जू च्या दीर्घकाळ अनुपस्थिमुळे अनेक अफवा पसरल्या होत्या. उत्तर कोरियाचे पूर्व हुकूमशाला किम जोंग २ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी डे ऑफ शायनिंग स्टार इन नॉर्थ कोरिया हा दिवस साजरा केला जातो.

उत्तर कोरियाची वृत्तसंस्था केसीएनएनं आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार किम जोंग यांनी आपल्या पत्नीला सभागृहात आणलं तेव्हा वेगळ्याच प्रकारचा गडगडाट ऐकू आला. अनेकांनी या दोघांचे स्वागत केले.

किम जोंग उन यांची पत्नी री सोल जू सार्वजनिक ठिकाणी दिसल्याची बातमी उत्तर कोरियाच्या वृत्तपत्रांवर पहिल्या पानावर छापून आली आहे. या दोघांचा फोटोही लावण्यात आला आहे.

असं मानलं जात आहे की, ३२ वर्षीय री सोल जू ला कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. ती कुठेही फारशी जात येत नव्हती. आपल्या पतीसोबत प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायची. गेल्या वर्षभरात ती कुठल्याही बाहेरच्या देशात गेलेली नाही.

माध्यम संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार री सोल जू चे नाव २०० पेक्षा जास्तवेळा चर्चेत आली आहे. स्वातंत्र्य राजकीय विश्लेशक रॅशेल मिनयंग ली यांनी सांगितले की, ''री सोल जू ला कोरोना व्हायरस कोरोनाचं संक्रमण झालं होतं. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते.''

दक्षिण कोरियाच्या गुप्तहेरसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार री सोल जू एका वर्षापासून आपल्या मुलांना सांभाळत आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमण काळात तिला आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचं होतं. म्हणून त्या सार्वजनीक ठिकाणी समोर आल्या नाहीत.