प्रेमासाठी सोडलं राजघराणं, आता सामान्य तरूणासोबत लग्न करणार आहे ही राजकुमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 01:15 PM2021-09-03T13:15:07+5:302021-09-03T13:21:28+5:30

२०१७ मध्ये माकोने घोषणा केली की, ती नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न करणार आहे. पण याच महिन्यात दोघांचं लग्न २०२० पर्यत थांबवण्यात आल.

२९ वर्षीय राजकुमारी माको जपानचे सध्याचे राजा नारूहितोचे भाऊ राजकुमार आकिशिनो यांनी मुलगी आहे. तिने तिचा प्रियकर कोमुरोसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर ते अमेरिकेत स्थायीक होण्याच्या विचारात आहेत. हे हे लग्न कधी होणार हे समोर आलं नाही. शाही परिवारही या लग्नासाठी तयार झाले आहेत.

राजकुमारी माकोचा प्रियकर कोमुरो अमेरिकेत कायद्याचं शिक्षण घेत आहे. कोमुरोबाबत सांगण्यात आलं आहे की, स्कीईंग व्हायोलिन आणि कुकिंगची त्याला आवड आहे. समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनाला वाढवण्यासाठी तो प्रिन्स ऑफ द सी म्हणून काम करतो.

माको म्हणाली की, आमच्यासाठी हृदयाचा सन्मान आणि जीवन जगण्यासाठी लग्न एक आवश्यक पर्याय आहे. ती म्हणाली की, 'आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही आणि वाईट काळात एकमेकांना साथ देत राहू'.

राजकुमारी माकोबाबत सांगण्यात आलं की, तिचा प्रियकर कोमुरोने डिसेंबर २०१३ मध्ये एका डिनरवेळी तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. दोघांनी बराच काळ त्यांचं प्रेम लपवून ठेवलं होतं. नंतर राजकुमारी ब्रिटनमध्य शिक्षणासाठी गेली.

२०१७ मध्ये माकोने घोषणा केली की, ती नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न करणार आहे. पण याच महिन्यात दोघांचं लग्न २०२० पर्यत थांबवण्यात आल. माकोचं तिचा प्रियकर कोमुरोवर इतकं प्रेम आहे की, तिने याआधी तिच्यासाठी आलेले लग्नाचे ७ प्रस्ताव नाकारले.

राजकुमारी माकोची आत्या राजकुमारी सयाको राजघराण्याची अखेरची सदस्य होती. जिने राजकुमारी पदवी परत केली होती. २००५ मध्ये राजकुमारी सयाकोने राजधानी टोकियोमद्ये एका अधिकाऱ्यासोबत लग्न केलं होतं. दोघेही सोबत शिकत होते. यावेळी दोघेही जवळ आले आणि त्यांचं प्रेम झालं.

जपानी राजवंशात केवळ पुरूष गादीचे उत्तराधिकारी असतात. या नात्याने राजकुमारी माकोचा लहान भाऊ राजकुमार हिसाहितो आपल्या वडिलांशिवाय गादीचा एकुलता एक दावेदार आहे. जपानमध्ये शाही नियमांनुसार, राजवंशाच्या बाहेर लग्न करणाऱ्या महिलेच्या पुत्रांना शाही गादीचा उत्तराधिकारी मानलं जात नाही.