Holi Special Tips : कपड्यांवर लागलेले रंग जाता जात नाहीत? हे उपाय कराल तर काम होईल सोपं....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 09:50 AM2020-03-10T09:50:33+5:302020-03-10T10:06:24+5:30

Holi Special Tips : अनेकदा या कपड्यांना लागलेले रंगांचे डाग दूर करणं अत्यंत अवघड काम. आज आम्ही तुम्हाला कपड्यांवर लागलेले रंगांचे डाग दूर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

होळी म्हणजे चौफेर रंगांची उधळण... हा रंगाचा सण असल्यामुळे या दिवशी सर्वचजण खूप रंग खेळतात. परंतु, होळीच्या दिवशी सर्वांना सतावणारी काळजी म्हणजे, कपड्यांची. कपड्यांना रंग लागला तर त्याचे डाग कपड्यांवरून जाता जात नाहीत.

तसेच रंगांमध्ये असणारे केमिकल्स कपड्यांना खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. अनेकदा या कपड्यांना लागलेले रंगांचे डाग दूर करणं अत्यंत अवघड काम. आज आम्ही तुम्हाला कपड्यांवर लागलेले रंगांचे डाग दूर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

१) ज्या कपड्यांवर रंग लागला आहे. एक बादली पाण्यामध्ये काही वेळासाठी लिंबाचा रस एकत्र करा आणि रंग लागलेले कपडे त्या पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर अर्धा कप लिंबाचा रस कपड्यांवर लावा आणि पुन्हा साबणाच्या मदतीने स्वच्छ करा. कपड्यांचा रंग निघून जाण्यास मदत होइल.

२) भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारा साबण फक्त भांडी धुण्यासाठी उपयोगी ठरत नाही. तर याव्यतिरिक्त कपड्यांचा रंग स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येतो.

३) दही जेवणाची चव वाढविण्यासाठी मदत करतं. त्याचप्रमाणे कपड्यांना लागलेला रंग दूर करण्यासाठीही दह्याचा वापर करण्यात येतो. रंग लागलेले कपडे दह्यामध्ये भिजत ठेवा आणि काही वेळानंतर कपड्यांना जिथे रंग लागला आहे हातांनी स्वच्छ करा. दोन ते तीन वेळा असं केल्याने रंग निघून जातो.

४) दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट कपड्यांवर लावून रंग काढू शकता. कपड्यांवर जिथे रंग लागला आहे. तिथे टूथपेस्ट लावा आणि जेव्हा टूथपेस्ट सुकेल त्यानंतर कपडे साबणाने धुवून टाका. ज्यामुळे रंगांचा डाग स्वच्छ होण्यास मदत होते.

५) कपड्यांवर लागलेल्या रंगांच्या डागांना नेलपेंट रिमूव्हरने स्वच्छ केलं जाऊ शकतं. रंग लागलेल्या ठिकाणी थोडंसं रिमूव्हर लावा. त्यानंतर डाग स्वच्छ होण्यास मदत होईल.

६) कपड्यांवरील रंग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. कपड्यांवर लागलेला रंग ब्लिचसोबतच बेकिंग सोडा जास्त फायदेशीर ठरतो.

७) व्हिनेगर रंग लागलेले कपडे स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अर्धा कप ते एक कप सफेद व्हिनेगरचा वापर करा. लक्षात ठेवा की, याचा वापर फक्त कॉटनच्या कपड्यांवर करता येतो.