आजी-आजोबांनी आपल्या नातीसाठी तयार केलं हॅरी पॉटर थीमचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 03:51 PM2019-09-07T15:51:10+5:302019-09-07T15:56:33+5:30

आजी-आजोबांचे नातवंडांवर मुलांपेक्षाही जास्त प्रेम असल्याचे पाहायला मिळते. आपल्या नातवंडांच्या आनंदासाठी आजी-आजोबा काहीतरी करत असतातच.

असाच एका आजी-आजोबांनी आपल्या नातीसाठी हॅरी पॉटर सारखं छोटसं घर तयार केलं आहे. हॉलिवूड सिनेमा असलेली हॅरी पॉटर सीरिज सर्वांनाच माहिती आहे.

हॅरी पॉटर सीरिजने लहान आणि मोठ्यांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे कॅनडात राहणाऱ्या आजी-आजोबांनी आपल्या दोन वर्षांच्या नातीसाठी हॅरी पॉटर थीमवर घर तयार केले आहे.

350 स्वेअर फूटांचे घर आहे. घराच्या मागील बाजूस गार्डनमध्ये लाकडी पूल, पाळणा आणि घसरगुंडी तयार केली केली.

प्ले हाऊसमध्ये जादूच्या कांडीचे दुकान आहे. याशिवाय, घरात इंटीरिअर सुद्धा संपूर्ण हॅरी पॉटरच्या थीमवर तयार करण्यात आले आहे.

सध्या या घराची सोशल मीडियावर जास्त चर्चा होत आहे. हे घर बनवण्यासाठी सहा आठवडे लागले. हॅरी, रॉन, हरमाइन आणि एल्बस डंबलडोरचे पोर्ट्रेट सुद्ध या घरात आहेत.