येथे आत्या नाही, तर सरकार ठरवतं मुलाचं 'नाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 04:06 PM2019-01-17T16:06:07+5:302019-01-17T16:08:31+5:30

ज्या नावांमुळे थट्टा केली जाऊ शकते, अशा नावनांना फ्रान्स सरकारने बंदी घातली आहे. न्यूटिला, स्ट्राबेरी, डेमन, प्रिंस विल्यिम आणि मिनी कपूर या नावांचा समावेश आहे.

जपानमध्ये बाळाचे नाव 'अकुमा' ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अकुमा या शब्दाचा अर्थ राक्षस असा होतो.

सौदी अरेबियात 50 नावांना बंदी घालण्यात आली आहे. बिंयामीन, मल्लिका, मलक, लिंडा आणि माया या व अशा धर्मविरोधी, देशविरोधी नावांना बॅन करण्यात आलंय.

नार्वेमध्ये आडनाव हे तुमचे पहिलं नाव ठेवण्यावर बंदी आहे. हैन्सन किंवा हगेन यांसारखी आडनावे तेथे बॅन करण्यात आली आहे.

डेन्मार्क सरकारने चिमुकल्यांच्या नावाची लिस्टच तयारी केली आहे. त्यानुसारच येथे लहान मुलांचे नाव ठेवण्यात येतात. 7 हजार नावांची ही लिस्ट आहे.