हिरा सापडणार म्हणून हजारो लोक खोदू लागले डोंगर, दिवसरात्र मेहनत केल्यावर काय लागलं हाती? वाचा....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:00 AM2021-06-22T11:00:05+5:302021-06-22T11:09:18+5:30

पूर्व दक्षिण आफ्रिकेच्या क्वाजुलु-नतालमध्ये एका डोंगरावर सापडलेल्या चमकदार धातुला लोक किंमती हिरा समजत होते.

दक्षिण आफ्रिकेतीलल एका गावात हिरा सापडल्याची बातमी ऐकून मोठ्या संख्येने लोक डोंगरावर पोहोचले आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी खोदकाम करू लागले. लोक दुरदुरून याच अपेक्षेने इथे पोहोचले की, त्यांच्याही हाती हिरे लागतील. यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत केली आणि खजिना मिळवण्यासाठी खोदकाम सुरू केलं. पण त्यांच्या या अपेक्षेवर आता पाणी फेरलं गेलं आहे.

पूर्व दक्षिण आफ्रिकेच्या क्वाजुलु-नतालमध्ये एका डोंगरावर सापडलेल्या चमकदार धातुला लोक किंमती हिरा समजत होते. पण मुळात तो एक सामान्य चमकदार दगड निघाला. सुरूवातीच्या तपासात समोर आलं की, हा दगड क्वार्ट्ज क्रिस्टल आहे.

'डेलीमेल' च्या रिपोर्टनुसार, डोंगरावर एका मेंढपाळाला चमकदार दगड सापडला होता. ज्याला तो हिरा समजला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अशात शेकडो लोक हिरे शोधण्यासाठी डोंगरावर पोहोचले आणि खोदकाम सुरू केलं.

हिरा सापडल्याची खबर मिळताच दूरदुरून लोक त्यांनाही हिरे सापडतील या आशेने तिथे पोहोचले. त्यांनी लगेच डोंगरावर परिवारांसोबत खोदकाम सुरू केलं.

सुरूवातीच्या तपासातून समोर आलं की, डोंगरावर सापडलेला चमकदार धातु केवळ एक सामान्य चमकदार दगड आहे. ज्याची किंमत हिऱ्याच्या तुलनेत फार कमी आहे.

डोंगरावर गर्दी झाल्याने सरकारला वैज्ञानिकांनी आणि मायनिंग एक्सपर्ट्सना सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी पाठवलं. त्यानंतर तपासातून समोर आलं की, सापडलेले दगड हिरे नाहीत.

वैज्ञानिक आणि मायनिंग एक्सपर्ट्सच्या सुरूवातीच्या तपासात समोर आलं की, डोंगरावर शोधण्यात आलेले दगड क्वार्ट्ज क्रिस्टल आहेत आणि त्यांची किंमत जास्त नाही.

हिरे सापडल्याची बातमी समोर येताच हजारोंच्या संख्येने लोक डोंगरावर पोहोचले होते आणि दिवसरात्र खोदकाम करत होते. आता प्रशासनाने लोकांना येथून परत पाठवलं आहे. कारण गर्दीमुळे कोरोनाचा धोकाही वाढला होता.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, हा भाग जोहान्सबर्गपासून १९० मैल म्हणजे साधारण ३०५ किलोमीटर दक्षिण-पूर्व डोलराइट नावाच्या ज्वालामुखीजवळ आहे आणि जिथे हिरे आहेत अशा क्षेत्रात हा भाग येत नाही.