म्हणून नेपाळमध्ये केली जाते कुत्र्यांची पूजा, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:16 PM2018-11-07T15:16:29+5:302018-11-07T15:22:46+5:30

नेपाळमधील पाच दिवसांचा हिंदू सण तिहारला सुरुवात झाली आहे. या पाच दिवसाच्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुकुर तिहार हा सण साजरा केला जातो. म्हणजे या दिवशी श्वानांची पूजा केली जाते.

येथील लोक हे श्वानाला यमाचा संदेशवाहक मानतात. त्यामुळे श्वानाची पूजा करुन किंवा त्याचा सन्मान करुन आपण यमाला खूश करु अशी भावना आहे.