अतिसुंदर - क्या 'ग्राफिटी' हाया हाया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 05:45 PM2018-11-26T17:45:44+5:302018-11-26T18:04:01+5:30

ग्राफिटी नेहमीच आपल्याला आकर्षिक करते, पण अशा ग्राफिटी पाहून आपण नक्कीच याच्या प्रेमात पडतो

पूर्वीच्याकाळी भिंतींवर शिल्प कोरली जायची, नंतर रंगांचे पेटींग आले. पण, आता या रंगबेरंगी ग्राफिटी वेगळाच आनंद देऊन जातात.

मदर तेरेसांना आपण नेहमीच पांढऱ्या साडीत पाहिलंय, पण त्यांचा हा रंगीबेरंगी लूक या ग्राफीटीमध्येच

3 डी ग्राफिटी हा एक ग्राफिटीमधील सर्वात चर्चेचा अन् आकर्षक प्रकार आहे. सध्या या ग्राफिटीची क्रेझ अने हॉटेल्समध्ये पाहायला मिळते.

भिंतीवरील ग्राफिटीही आकर्षक असतात. विशेष म्हणजे आपल्या आवडीच्या कलाकाराचे किंवा खेळाडूच्या चित्राचीही आपण ग्राफिटी बनवू शकतो

भिंतीवर साकारण्यात आलेली ही ग्राफिटी जणू साक्षात ती मुलगीच समोर अवतरल्याचा भास करुन देते.

हे खरोखरीची फुले नाहीत किंवा भिंतही अशा रंगाची नाही. तर या भिंतीवर साकारण्यात आलेली ही सुंदर ग्राफिटी आहे.

दोन उंचच उंच अपार्टमेंटच्या भिंतीवरील ही ग्राफिटी. जणू शाळकरी मुलं एकमेकांकडे धावतायेत की काय असंच वाटतंय

रंगीबेरंगी अन् डिझाईनपूर्ण अशा ग्राफीट रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतातच.

तुमची मान हलवल्याशिवाय हे चित्र तुमच्या लक्षातच येणार नाही. कारण, या चित्रात आहे मक्याचा मळा अन् एक माणूस. पण हे शेत असल्याचा भास आपल्याला नक्कीच होणार

एखादया कार्यक्रमासाठी तुम्ही स्टेज उभारता. त्या ठिकाणी तुम्हाला अशा ग्राफिटी तयार करता येतील, ज्या तुम्ही गरजेनुसार बदलू शकतो.

तुम्ही शाळेत असताना मुक्तहस्त चित्र काढलं असेल, तुमच्या शाळेतील चित्रकलेची आठवण करुन देणारी हा ग्राफिटी.